भाजपच्या दोन नगरसेविकांमध्ये तुफान राडा ! VIDEO

भाजपच्या दोन नगरसेविकांमध्ये तुफान राडा ! VIDEO

मुंबई – मिरा रोडमध्ये भाजपच्या दोन नगरसेविकांमध्ये तुफान राडा झाला असून याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिरारोडच्या हॉट केश परिसरात छत्री वाटपाच्या कार्यक्रमात हा राडा झाला आहे. माजी महापौर व भाजप नगरसेविका गीता जैन आणि भाजप नगरसेविका रुपाली शिंदे यांच्यामध्ये मारामारी झाली आहे.

दरम्यान शनिवारी दुपारी हॉटकेशमध्ये छत्री वाटपाच्या कार्यक्रमचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी महापौर गीता जैन यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. ज्या शेड खाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तो शेड नगरसेविका रुपाली शिंदे यांच्या निधीतून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या शेड खाली कार्यक्रम करून नका असा इशारा रूपाली शिंदे यांनी दिला. त्यावरुन दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि याचं रुपांतर हाणामारीत झाले.

COMMENTS