मुंबई काँग्रेसचं नेतृत्व ‘या’ नेत्यांकडे, एक अध्यक्ष आणि दोन कार्यध्यक्षांची होणार नियुक्ती?

मुंबई काँग्रेसचं नेतृत्व ‘या’ नेत्यांकडे, एक अध्यक्ष आणि दोन कार्यध्यक्षांची होणार नियुक्ती?

मुंबई – महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा तोडगा निघाल्यानंतर आता मुंबई काँग्रेसच्या अध्यपदासाठी पक्षात हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र काँग्रेसप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्येही एक अध्यक्ष आणि दोन कार्याध्यक्षांची नेमणूक केली जाणार असून मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद तर एकनाथ गायकवाड आणि हुसैन दलवाई यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसात मुंबई काँग्रेसबाबत निर्णय होण्याची शक्यता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान एकनाथ गायकवाड दलित तर हुसेन दलवाई मुस्लिम असा जातीय-सामाजिक विचार करत कार्याध्यक्षांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात हे बदल केले जात आहेत. त्यामुळे या बदलांचा पक्षाला कितपत फायदा होणार हे निवडणुकीनंतरच समजणार आहे.

COMMENTS