मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित, प्रिया दत्तही निवडणुकीच्या मैदानात ?

मुंबईतील चार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित, प्रिया दत्तही निवडणुकीच्या मैदानात ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील चारही मतदारसंघातील काँग्रेसकडून उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. यामध्ये आगामी निवडणूक लढवण्यास नकार देणा-या प्रिया दत्त यांचंही नाव आहे. त्यामुळे प्रिया दत्त या पुन्हा लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा,दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड किंवा भालचंद्र मुणगेकर तर उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांचं नाव निश्चित मानलं जात आहे.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत सभा घेतली. यावेळी प्रिया दत्तही व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यामुळे प्रिया दत्त या पुन्हा लोकसभेच्या मैदानात उतरल्या असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु 2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रिया दत्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

 

COMMENTS