विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक!

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेत्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे.ही बैठक विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या निवासस्थानी होणार असून बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वड्डेटीवार, बाळासाहेब थोरात यांसह काँग्रेसचे काही नेते उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांना विधानसभेच्या कोणत्या जागा द्यायच्या याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. तसेच मित्र पक्षांबरोबर कधीपासून जागा वाटपाची चर्चा करायची, वंचित आघाडीबाबत काय भूमिका घ्यायची यावरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS