लोकलसेवा सुरू करा,  अन्यथा….,मंबईतील डबेवाले आक्रमक ! VIDEO

लोकलसेवा सुरू करा, अन्यथा….,मंबईतील डबेवाले आक्रमक ! VIDEO

मुंबई – मुंबईतील डबेवाले आक्रमक झाले असून शहरातील लोकलसेवा लवकरात लवकर सुरु करा अन्यथा डबेवाल्यांना महिना किमान 3 हजार रुपये द्या अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

काय म्हणालेत तळेकर?

कोराना या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला तसा १९ मार्च पासुन मुंबईत डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद केला पुढे लाॅकडाऊन झाले व ते लाॅकडाऊन अजुन चालूच आहे. गेली साडेपाच महीने डबेवाल्यांना रोजगार नाही. रोजगार नसल्यामुळे डबेवाल्यांची आर्थीक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.
मुंबई थोडी थोडी पूर्वपदावर येऊ पहाते आहे. काही शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये चालू होत आहेत या कार्यालयात चाकरमानी अंशत: का होईना कामावर रूजू होऊ लागला आहे. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोहच करायला सांगत आहे.
पण लोकलसेवा जो पर्यंत पुर्ण पणे चालू होत नाही तोपर्यंत डबेवाला कामावर रूजू होऊ शकत नाही. म्हणुन “ मुंबई डबेवाला असोशिएशन” केंद्र सरकार मागणी करते आहे की मुंबईतील लोकल सेवा चालू करण्यात यावी किंवा मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानुन त्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा.

PAGES

1 2

COMMENTS