भाजप खासदार किरीट सोमय्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून मनसेचा उमेदवार ?

भाजप खासदार किरीट सोमय्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून मनसेचा उमेदवार ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. लोकसभेसाठी मनसेनं 4 ते 5 जागांची मागणी केली असल्याची माहिती आहे. यामध्ये मुंबईतील इशान्य मुंबई मतदारसंघावर मनसेनं दावा केला आहे. त्यामुळे मनसेला आघाडीत घेतलं तर इशान्य मुंबई मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात  राष्ट्रवादीकडून मनसेकडून महेश मांजरेकर यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. मागील निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे यावेळी ही जागा मनसेला दिली तर महेश मांजरेकर विरुद्ध किरीट सोमय्या असा सामना या मतदारसंघात पहायला मिळू शकतो अशी शक्यता आहे.

दरम्यान महेश मांजरेकर यांनी 2014 मध्ये उत्तर पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. इशान्य मुंबई हा मतदारसंघ मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तरभारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. तसेच तसेच या मतदारसंघात एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. यावरुन या मतदारसंघात शिवसेना, भाजपची ताकद जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसेला ही जागा दिली तर शिवसेना-भाजपपुढे मनसेचा टिकाव लागणार का ? हे पाहणं गरजेचं आहे.

 

COMMENTS