‘नाईट लाईफ’ला मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदिल – अनील देशमुख

‘नाईट लाईफ’ला मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदिल – अनील देशमुख

मुंबई – नाईट लाईफला मुंबईतील बैठकीत हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. याबाबतची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मुंबईत पर्यटक येतात, रात्री काम करणारे मुंबईकर असतात त्यांची अडचण असते असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तर मंत्रिमंडळात मुंबई 24 तास योजनेवर चर्चा झाली असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंबई 24 तासची माहिती मी मंत्रीमंडळात दिली. रात्री काही खरेदी करायची असेल तर अडचण असते. मॉल किंवा मिल कंपाऊंड अशा ठिकाणी कुणी राहत नाही तिथल्या दुकाने, हॉटेल्स, थिएटर यांना 24 तास खुलं ठेवण्याची परवानगी देत आहोत. लंडनची नाईट लाईफ अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. आपल्यालाही यातून महसूल वाढेल, रोजगार वाढेल. पोलीसांवर ताण येणार नाही.सध्या पोलीस दुकाने 1.30 नंतर बंद झाले आहेत का ते बघतात, आता त्यांना सुरक्षेसाठी वेळ देता येईल. तसेच पब आणि बार 24 तास सुरू राहणार नाहीत. महाविकास आघाडी सरकार जेनतंचं सरकार आहे. केंद्र सरकारच्या योजना युवकांविरोधी आहे. आम्ही युवकांना रोजगार देतोय. मुंबईतील सर्व अनिवासी क्षेत्रात ही योजना सुरू राहिल. मात्र उत्पादन शुल्क कायद्याला हात लावलेला नाही, त्यामुळे पब आणि बार 1.30 वाजेपर्यंतच सुरू राहतील. पहिला टप्पा 27 तारखेपासून सुरू करणार आहोत, चार ठिकाणी सुरुवातीला सुरू करणार असल्याचं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS