मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी !

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी !

मुंबई – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची वर्णी लागली आहे. पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवा निवृत्त झाले. संजय बर्वे यांच्या जागी कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु आज अखेर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. ठाकरे सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली आहे.

दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी परमबीर सिंह यांच्यासह, अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकदेशम यांचीही नावं चर्चेत होती. परंतु ठाकरे सरकारनं आज अखेर अखेर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती केली आहे.

परमबीर सिंह हे यापूर्वीही मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती. परमबीर सिंह यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तही होते. सध्या परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.

COMMENTS