मुंबईत रेल्वेचा रविवारी विशेष ब्लॉक, रेल्वे सेवा आठ तास बंद, लोकल, एक्स्प्रेस गाड्यांचं सविस्तर वेळापत्रक !

मुंबईत रेल्वेचा रविवारी विशेष ब्लॉक, रेल्वे सेवा आठ तास बंद, लोकल, एक्स्प्रेस गाड्यांचं सविस्तर वेळापत्रक !

मुंबई – मध्ये रेल्वेवर रविवारी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेवर सीएसटी ते दादरपर्यंत लोकल सेवा सहा ते आठ तासांपर्यंत बंद राहणार आहे. गर्डर उभारताना संपूर्ण मार्गावरील विद्युतपुरवठा खंडीत करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सावधगिरी बाळगत सहा ते आठ तासांपुरता हा प्रवाह खंडीत करण्यात येणार आहे. सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल दादर आणि कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

असा असणार मेगा ब्लॉक

सकाळी 8.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत (8 तास)

अप फास्‍ट लाइन वर तसेच सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत (6 तास) डाऊन फास्‍ट आणि अप फास्ट आणि डाऊन स्‍लो मार्गावर

 

मेल / एक्सप्रेस गाड्या

दिनांक 3.2.2018 रोजी सुटणा-या खालील गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

  1. गाडी क्रमांक 11024 कोल्हापुर – सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस
    2. गाडी क्रमांक 12140 नागपुर – सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस

दिनांक 4.2.2018 रोजी सुटणा-या खालील गाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

  1. . गाडी क्रमांक 11009/11010 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
    2. . गाडी क्रमांक 22101/22102 सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस
    3. . गाडी क्रमांक 12123/12124 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्‍वीन एक्सप्रेस
    4. . गाडी क्रमांक 1210 9/12110 सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
    5.  गाडी क्रमांक 12125/12126 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगति एक्सप्रेस
    6. गाडी क्रमांक 12139 सीएसएमटी-नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस
    7.  गाडी क्रमांक 11023 सीएसएमटी-कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेस

अप मेल / एक्सप्रेस गाड्यांना रेगुलेट/ शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत

  1. दिनांक 2.2.2018 रोजी हावड़ा येथून निघणारी गाडी क्रमांक 12321 हावड़ा-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसला ठाणे स्‍थानकात शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.
  2. दिनांक 3.2.2018 रोजी चेन्नईहुन निघणारी गाडी क्रमांक 11042 चेन्नई – सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसला कल्याण स्‍थानकात काही काळासाठी थांबविली जाईल आणि दादर स्‍थानकात टर्मिनेट केली जाईल.
  3. दिनांक 3.2.2018 रोजी वाराणसीहुन निघणारी गाडी क्रमांक 11094 वाराणसी-सीएसएमटी मुंबई महानगरी एक्सप्रेसला कल्याण स्‍थानकात काही काळासाठी थांबविली जाईल आणि दादर स्‍थानकात टर्मिनेट केली जाईल.
  4. दिनांक 3.2.2018 रोजी हैदराबादहुन निघणारी गाडी क्रमांक 17032 हैदराबाद-सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसला कल्याण स्‍थानकात काही काळ थांबविण्‍यात येईल. ही गाड़ी 17.30 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहचेल.

दिनांक 4.2.2018 रोजी डाउन मेल / एक्सप्रेस गाड्यांचे पुन:निर्धारण (Re-sheduling)

1. गाडी क्रमांक 12869 सीएसएमटी मुंबई -हावड़ा एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार 15.35 वाजता (निर्धारित वेळ 11.05 वाजता) सुटणार आहे.

2. गाडी क्रमांक 16339 सीएसएमटी मुंबई – नागरकोइल एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार 16.25 वाजता (निर्धारित वेळ 12.10 वाजता) सुटणार आहे.

3. गाडी क्रमांक 17031 सीएसएमटी मुंबई – हैदराबाद एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार 17.10 वाजता (निर्धारित वेळ 12.45 वाजता) सुटणार आहे.

4. गाडी क्रमांक 11041 सीएसएमटी मुंबई – चेन्नई एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार 17.50 वाजता (निर्धारित वेळ शनिवार 14.00 वाजता) सुटणार आहे.

5. गाडी क्रमांक 1101 9 सीएसएमटी मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार 15.20 वाजता (निर्धारित वेळ 15.10 वाजता) सुटणाप आबे,

6. गाडी क्रमांक 12322 सीएसएमटी मुंबई – हावड़ा कोलकाता मेल पुन: निर्धारित वेळेनुसार दिनांक 5.2.2018 रोजी 00.10 वाजता (निर्धारित वेळ  4.2.2018 रोजी 21.30 वाजता) सुटणार आहे.

7. गाडी क्रमांक 11027 सीएसएमटी मुंबई – चेन्नई मेल पुन: निर्धारित वेळेनुसार 5.2.2018 रोजी 00.45 बजे (निर्धारित वेळ  4.2.2018 रोजी 23.45 वाजता) सुटणार आहे.

8. गाडी क्रमांक 11093 सीएसएमटी मुंबई – वाराणसी महानगरी एक्सप्रेस पुन: निर्धारित वेळेनुसार दिनांक 5.2.2018 रोजी 01.10 वाजता (निर्धारित वेळ 5.2.2018 रोजी 00.10 वाजता) सुटणार आहे.

COMMENTS