अयोध्येनंतर आता पंढरपूरवारी, राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे विठु माऊलीच्या दरबारी !

अयोध्येनंतर आता पंढरपूरवारी, राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे विठु माऊलीच्या दरबारी !

मुंबई – राम मंदिराच्या प्रश्नावरुन शिवसेना आणखी आक्रमक झाली आहे. आयोध्या वारीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पंढरपूरमध्ये सभा घेणार आहेत. येत्या 24 तारखेला पंढरपूरमध्ये ही सभा होणार आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी ही सभा घेणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेना भवनात राज्यातील पदाधिका-यांची बैठक आज शिवसेना भवनात झाली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एका उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावरुन भाजपवर हल्लाबोल केला.

शिवसेनेने हा मुद्दा का हाती घेतला हे सर्वांना माहित आहे. काहीलोक निवडणुक आली की राम नामाचा जप करतात. चार वर्ष सत्तेवर येऊन राम मंदिराविषयी काहीच होत नसेल तर झोपलेल्या कुंभकर्णाला जाग करावचं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ कोर्टाकडे बोट दाखवून चालणार नाही. तर लोकांना आता कृती हवी आहे. कसं करायचं ते तुम्ही ठरवा पण तातडीनं राम मंदिंर बांधा असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची पदाधिका-यांची बैठक महत्वाची समजली जात होती. भाजपवर उद्धव ठाकरे जहरी टीका करत असले तरी गेल्या काही दिवसात दोन्ही पक्षात सुसंवाद वाढत असल्याचं चित्र होतं. वाशिमध्ये मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्याआधी एक दिवस मुंबईत उद्धव ठाकरे आणि गडकरी एकत्र येणार होते. मात्र गडकरींच्या काही अडचणीमुळे ते शक्य झालं नाही. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरी करताना पुन्हा एकदा कमळ आणि बाण यांचं सरकार येणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात. पदाधिका-यांना काय मार्गदर्शन करतात याकडं संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. मात्र पुन्हा एकदा उद्धव यांनी भाजपवर निशाणा साधल्यामुळे शिवसेनेचा स्वबळाचा नारा अजून तरी कायम आहे असचं म्हणावं लागेल.

COMMENTS