शिवसेनाभवनात उद्धव ठाकरेंनी घेतली नगरसेवकांसोबत बैठक !

शिवसेनाभवनात उद्धव ठाकरेंनी घेतली नगरसेवकांसोबत बैठक !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाभवनात आज मुंबईतल्या नगरसेवकांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीला सुरुवात झाली असून मुंबईतल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, शिक्षक आणि मुंबई पदवीधर निवडणुकीसाठी ही बैठक बोलवण्यात आली होती.तसेच मुंबईतल्या पावसाबाबत उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं आबे,

दरम्यान पावसाळ्यामध्ये दर वर्षी मुंबई महापालिका तुंबते त्यामुळे या मुंबईकरांचे मोठे हाल होतात. दोन दिवसांपूर्वीही जोरदार पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी मुंबईची तुंबई झाली होती. त्यामुळे या महापालिकेत काय खबरदारी घेता येईल अथवा ज्या ज्या विभागात पाणी मोठ्याप्रमाणात तुंबते त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील यासाठी स्थानिक नगरसेवकांकडून माहिती घेऊन त्यावर अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा केली. तसेच शिक्षक आणि मुंबई पदवीधर निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

COMMENTS