अन् धनंजय मुंडे झाले भावूक, ‘हा माझ्यासाठी दुःखद प्रसंग’

अन् धनंजय मुंडे झाले भावूक, ‘हा माझ्यासाठी दुःखद प्रसंग’

वर्धा – विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या बोंडअळीमुळे हैराण झाला आहे. बोंडअळीमुळे अनेक शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच शेतक-यांच्या पिकांची पाहणी राष्ट्रवादीचे नेते हल्लाबोल यात्रेच्या माध्यामातून करत आहेत. वर्धा येथील पवनारमधील श्रीकांत तोटे यांच्या शेतात गेले असता या शेतक-यानं थेट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना आपल्या शेतातील कापसावर ट्रॅक्टर फिरवण्याची विनंती केली. या शेतक-यानं केलेली दुःखद विनंती ही धनंजय मुंडेंनाही भावूक करुन गेली.

पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेलं पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची विनंती या शेतक-यानं केल्याची पाहून धनंजय मुंडेंनी भावूक होवून मिही एका शेतक-याचा मुलगा आहे. त्यामुळे उभ्या पिकावर नांगर फिरवणं कितपत दुःखदायक आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे हा प्रसंग माझ्यासाठी दुःखद असल्याचं  त्यांनी म्हटलं.

बोंडअळीमुळे कापूस उत्पादक हैराण झालेला असताना सरकार मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. तसेच झोपलेलं सरकार कधी जागं होणार असा सावलही त्यावेळी विरोधांनी केला.

COMMENTS