सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – धनंजय मुंडे

सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा – धनंजय मुंडे

मुंबई –  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.जो न्याय एकानाथ खडसेंना दिला तोच न्याय देशमुखांना लावावा असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशी असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी न्यायलयात सादर केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

दरम्यान हे प्रकरण गंभीर असून बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जो न्याय एकनाथ खडसे यांना दिला तोच न्याया सुभाष देशमुख यांना लावावा असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मागील एक वर्षांपासून आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा विषय लावून धरला आहे. आगामी काळातही हा विषय लावून धरणार असून मुख्यमंत्री आता तरी कारवाई करणार का की नेहमीप्रमाणे विषयाला बगल देणार असा सवालही मुंडे यांनी केला आहे. तसेच न्यायालयात हा विषय गेला नसता तर सरकारने कधीच न्याय दिला नसता असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दोषी आढळल्यास मंत्रीपदावरुन दूर होईन तसेच बंगला बेकायदेशीर असल्यास स्वखर्चाने जमीनदोस्त करतो अशी प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

COMMENTS