तिच्या समर्थनात भाजप; राष्ट्रवादी, सेनेचे नो कॉमेंट्स

तिच्या समर्थनात भाजप; राष्ट्रवादी, सेनेचे नो कॉमेंट्स

मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप एका महिलेने केला. यावर भाजपच्यावतीने प्रदेधाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यासमोरी अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच ज्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होतात. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरिक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, असा टोला लगावला.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर मुंडे प्रकरणी शिवसेना काय भुमिका घेते, याकडे लक्ष लागलं असतानाच मंत्री नवाब मलिक यांनी “धनंजय मुंडे यांचं हे कौटुंबिक प्रकरण आहे. याविषयावर मी अधिक काही बोलणार नाही. याविषयी तेच बोलतील, असे सांगितले. तर मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र याविषयावर न बोलता ‘नो कॉमेंट्स’चा पवित्रा घेतला. आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याप्रकरणी काय भुमिका घेतात, तसंच पुढे काय पाऊल टाकतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS