राज्यातही अनेक विजय मल्ल्या – सुधीर मुनगंटीवार

राज्यातही अनेक विजय मल्ल्या – सुधीर मुनगंटीवार

नागपूर – राज्यातही अनेक विजय मल्ल्या असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शासनाचा कोट्यवधींचा विक्रीकर बुडवून राज्यातील अनेक व्यापारी बेपत्ता झाले आहेत. तसेच या व्यापा-यांचा ठिकाणा लागत नसल्यामुळे विक्रीकर वसुली करण्यात अडचण येत असल्याचं मुनगंटीवार यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

दरम्यान राज्यातील अनेक व्यापा-यांनी जवळपास २९०० कोटींचा विक्रीकर बुडवला असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच थकबाकीदार व्यापारी बेपत्ता झाले असून या व्यापाऱ्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचं ते म्हणाले आहेत. आयकर विभागाशी संपर्क करून प्रलंबित थकबाकी वसुलीसाठी व्यापा-यांचे अद्ययावत बँक खाते व इतर तपशील मिळवण्यासाठी विक्रीकर विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लेखी उत्तरात म्हटलं आहे. तसेच बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्यांच्या तपासासाठी पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस, कंपनी रजिस्ट्रार यांना निर्देश दिले असल्याचंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS