आमदारांच्या फोडाफोडीच्या आरोपावर सुधीर मुनगंटीवार म्हणतात…

आमदारांच्या फोडाफोडीच्या आरोपावर सुधीर मुनगंटीवार म्हणतात…

मुंबई – कोणत्याही विरोधी आमदाराला आमच्याकडून संपर्क केला गेला नसल्याचं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आरोप करणाय्रा काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी असंही ते म्हणाले आहेत. हा आरोप म्हणजे त्यांच्याच आमदारांचा आणि राज्यातील मतदारांचा अवमान आहे. कोणाला फोन आले असतील तर त्यांनी कॉल रेकॉर्ड काढावा आणि तो समोर आणावा. सरकार महायुतीचे बनेल यावर आम्हाला विश्वास आहे. जनादेशाच्या आधारावर सरकार बनेल असेही ते म्हणाले. भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर ते बोलत होते.

दरम्यान शिवसेनेच्या आमदाराला भाजपने 50 कोटींची ऑफर दिली असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या आमदारांशीही भाजपने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे.पक्षांतर करणाऱ्या 80 टक्के माजी आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. हा धडा सगळ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याची आता कोणाची हिंमत होणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या आरोपावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणत्याही विरोधी आमदाराला आमच्याकडून संपर्क केला गेला नसल्याचं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आरोप करणाय्रा काँग्रेस-राष्ट्रवादीने माफी मागावी असंही ते म्हणाले आहेत.

COMMENTS