बृहन्मुंबईसह 7 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर !

बृहन्मुंबईसह 7 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर !

मुंबई – बृहन्मुंबईसह 7 महानगरपालिकांतील रिक्तपदांसाठी निवडणूक लवकरच निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 6 एप्रिलरोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, जळगाव, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी हे मतदान पार पडणार असून 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 13 ते 20 मार्च 2018 या कालावधीत दाखल करता येतील. 18 मार्च 2018 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 21 मार्च 2018 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 23 मार्च 2018 पर्यंत असणार आहे. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 24 मार्च 2018 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 6 एप्रिल 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग

बृहन्मुंबई- 173, नाशिक- 13-क, सोलापूर- 14-क, जळगाव- 26-ब, पुणे- 22-क, अहमदनगर- 32-ब आणि उल्हासनगर- 17-ब

COMMENTS