विविध महानगरपालिकांमधील 6 रिक्तपदासांठी आज मतदान !

विविध महानगरपालिकांमधील 6 रिक्तपदासांठी आज मतदान !

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. तसेच मतमोजणी 7 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचंही सहारिया यांनी म्हटलं आहे.

महानगरपालिकानिहाय पोटनिवडणूक होत असलेल्या प्रभागाचे नाव व उमेदवारांची संख्या

बृहन्मुंबई (173)- 3

नाशिक (13-क)- 8

सोलापूर (14-क)- 9

पुणे- (22-क) 5

अहमदनगर- (32-ब)- 3

उल्हासनगर (17-ब)- 4

COMMENTS