जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल !

जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल !

मुंबई – दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारमध्ये तात्पुरतं खातेवाटप करण्यात आलं होतं. परंतु या खातेवाटपामध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते आता जयंत पाटील यांना देण्यात आले आहे. तर अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती आता छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहेत. या खातेबदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

दरम्यान या बदलानंतर छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण ही खाती देण्यात आली आहेत. तर जयंत पाटील यांच्याकडे वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, ग्राहक संरक्षण, कामगार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास ही खाती आली आहेत.

COMMENTS