काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं निधन !

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं निधन !

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन.डी. तिवारी यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. एन.डी. तिवारी यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. तसेच दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्रमंत्रीही होते. नारायण दत्त तिवारी यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२५ साली झाला होता.

नारायण दत्त तिवारी यांची कारकीर्द

आंध्र प्रदेश राज्याचे २००७ साली ते राज्यपाल होते. तसंच मार्च २००२ ते मार्च २००७ या काळात उत्तरांखंडचे आणि जानेवारी १९७६ ते एप्रिल १९७७, ऑगस्ट १९८४ ते सप्टेबर १९८५ आणि जून इ.स. १९८८ ते डिसेंबर १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अशा प्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. ११९८च्या निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्याचबरोबर जून १९८० ते जुलै १९८१ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ऑक्टोबर १९८० ते फेब्रुवारी १९८३ या काळात केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, उद्योगमंत्री,अवजड उद्योगमंत्री आणि कायदामंत्री अशी पदंही त्यांनी भूषविली. तसंच जून १९८५ ते ऑक्टोबर १९८६ या काळात ते पेट्रोलियम मंत्री,ऑक्टोबर १९८६ ते जुलै १९८७ या काळात ते परराष्ट्रमंत्री आणि जुलै १९८७ ते जून १९८८ या काळात ते अर्थमंत्री होते.

COMMENTS