नागालँड विधानसभा निवडणूक अडचणीत, सर्वच पक्षांनी सोडलं मैदान !

नागालँड विधानसभा निवडणूक अडचणीत, सर्वच पक्षांनी सोडलं मैदान !

नागालँड – विधानसभा निवडणुकीवर काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी बहिष्कार घातला आहे.  येत्या २७ फेब्रुवारीला नागालँडमधील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. परंतु राज्यातील नागा समाजाच्या दशकभरापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी राज्यातील काँग्रेस, भाजपसह 11 पक्षांनी या निवडणुकीचं मैदान सोडलं आहे.तसेच या समाजाच्या मागण्या जोपर्यंत  केंद्र सरकार पूर्ण करत नाही, तोपर्यंत विधानसभा निवडणुकीत भागच घेणार नसल्याचं या पक्षांनी म्हटलं आहे. सर्वच पक्ष एकत्र आल्यामुळे केंद्र सरकारची मोठी कोंडी झाली असल्याचं दिसत आहे.

२०१५ मध्ये नागा समुदायांच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागा समुदायाच्या शिष्टमंडळामध्ये एक करार झाला होता. त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच निवडणुकांपेक्षा नागा शांती करार महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून राज्यातील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचं या पक्षांनी जाहीर केलं आहे.  नागालँड आदिवासी होहो आणि नागरिक संघटनेच्या कोर कमिटीने याबाबत बैठक घेतली होती. या बैठकीला ११ ही पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. या सर्वांनी निवडणूक न लढविण्याच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या बैठकीत नागा पिपल्स फ्रंट, काँग्रेस, भाजप, नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक पिपल्स पार्टी, नागालँड काँग्रेस, युनायटेड नागालँड डेमोक्रॅटीक पार्टी, आम आदमी पक्ष, नॅशनल काँग्रेस पार्टी, लोक जन पार्टी, संयुक्त जनता दल आणि नॅशनल पिपल्स पार्टीचे पदाधिकारी उपस्थिती लावली होती.

 

COMMENTS