नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का !

नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का !

नागपूर – विदर्भातील 7 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. गडचिरोली वगळता सर्व मतदारसंघात शांततेत मतदान पार पडत आहे. नागपुरातही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे.  नागपुरातील न्यू इंग्लिश स्कूलमधल्या मतदान केंद्रावर
भाजपचे उमेदवार नितीन गडकरींनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही पुन्हा एकदा गडकरींनी व्यक्त केला आहे.

तसेच नितीन गडकरींच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनीही नागपुरात सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सकाळी सात वाजण्यापूर्वीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले होते.

दरम्यान या मतदान केंद्रावर लावण्यात आलेल्या  उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले असल्याचं पहावयास मिळाले आहे. यामध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ असा शिक्का मारण्यात आला आहे. एवढी सुरक्षा असतानाही हे शिक्के कुणी मारले हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS