‘मनसे’च्या दणक्यानंतर राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय !

‘मनसे’च्या दणक्यानंतर राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय !

नागपूर – मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरुन राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याची घोषणा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधीमंडळात केली आहे.  तसेच एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये तशी बंदी करण्यात आली असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचंही अन्न पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत म्हटलं आहे.

दरम्यान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमती आणि बाहेरील वस्तू नेण्याबाबत लक्षवेधी सादर केली. त्यानंतर या लक्षवेधीला उत्तर देताना रविंद्र चव्हाण यांनी बाहेरील अन्न पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये नेण्यास बंदी नसल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मल्टिप्लेक्समध्ये अनेक वस्तूंवर अव्वाच्या सव्वा किंमत लावली जात असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन तोडफोड केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टानेही या मल्टिप्लेक्सवाल्यांना फटकारले होते. त्यानंतर आता राज्य सरकारनं घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर चित्रपट पाहण्यासाठी जाणा-या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

COMMENTS