अधिवेशनादरम्यान शरद पवारांनी पहिल्यांदाच घेतली आमदारांची बैठक! VIDEO

अधिवेशनादरम्यान शरद पवारांनी पहिल्यांदाच घेतली आमदारांची बैठक! VIDEO

नागपूर – नागपुरात दाखल झालेल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. शरद पवार प्रथमच नागपूरात येऊन आपल्या आमदारांना मार्गदर्शन करत आहेत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शरद पवारांनी राज्याच्या राजकारणात जास्त लक्ष घातलं आहे. अधिवेशन काळात नागपूरात येऊन आपल्या आमदारांची बैठक घेण्याची पवारांची ही पहिलीच वेळ आहे. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील विविध प्रश्नांवर काय भूमिका घ्यायची याबाबत पवार यांनी या बैठकीत आमदारांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS