विधानभवनासमोर दिव्यांग तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !

विधानभवनासमोर दिव्यांग तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !

नागपूर – विधान भवनासमोर तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. आशिष आमदरे असं या तरुणाचं नाव असून त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. एका दिव्यांग तरुणाने विधानभवनासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी त्याच्या अंगावर तात्काळ पाणी टाकून त्याला ताब्यात घेतले आहे. ओसीडब्ल्यु पाणीपुरवठा करणार्‍या एका ट्रकने काही दिवसापूर्वी आशिष आमदरे याला धडक दिली होती. याप्रकरणी त्याने ओसीडब्ल्यू आणि पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु त्याच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नसल्यामुळे या तरुणानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती आहे.

दरम्यान या तरुणाने याबाबतची तक्रार नितीन गडकरी यांच्याकडे देखील तक्रार केली होती. परंतु न्याय न मिळाल्यामुळे त्याने विधानभवनासमोर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून ते अधिक तपास करत आहेत.

अधिवेसनादरम्यान ही दुसरी घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विधानभवनासमोर कालच महापालिकेच्या सफाई कर्मचारी प्रकाश बर्डे याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. महापालिकेने पुन्हा सेवेत घ्यावे, अशी त्याने मागणी केली होती.

 

COMMENTS