राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल, नागपूरमध्ये भाजपला धक्का!

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल, नागपूरमध्ये भाजपला धक्का!

नागपूर – राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झालीय. या जिल्हा परिषद निकालांकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं असून आजी-माजी मंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

धुळे जुल्हा परिषदेत आतापर्यंत भाजपला 28, शिवसेना 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादीनं दोन जागांवर विजय मिळवला आहे.

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं.धापेवाड्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झाले आहेत. बावनकुळेंना तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या मतदारांनी भाजपला मतदान केलं.

तसेच नागपूरमधील 58 गटांच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीचा कल काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने झुकताना दिसत आहे. नागपूर हिंगणातून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग यांचे पुत्र दिनेश बंग विजयी झाले. तर येनवामधून शेकापचे समीर उमप, तर आरोली-कोदामेडीमधून काँग्रेसचे योगेश देशमुख विजयी झाले आहेत. या तिन्ही ठिकाणी भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला.

COMMENTS