त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही.

त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही.

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने नाना पटोलेंनी निशाणा साधत अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे शुटिंग होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यास फडणवीसांना हा प्रसिध्दीसाठी स्टंट आहे, अशी खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता फडणवीसांच्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“सत्तापक्ष का नेता न हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ, याच नकारात्मक भूमिकेतून माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे”, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं.

COMMENTS