पंतप्रधान मोदी नटसम्राट; नाना पटोलेंना टोला

पंतप्रधान मोदी नटसम्राट; नाना पटोलेंना टोला

नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या कारकीर्दीचा उल्लेख करताना भावूक झाले होते. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. यावरुन संजय राऊत, अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही नरेंद्र मोदींना यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगं ठरणार नाही. त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं.
राज्यसभेत मोदींची नौटंकी आपण पाहिली. त्यांना टिकैत आणि शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत का? जे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते. मोदींना आजवर अनेकदा रडताना पाहिलं आहे. ते नटसम्राट आहेत.”

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज (10 फेब्रुवारी) पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी इथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

COMMENTS