पदभार स्विकारताच नानांनी दिला नवा नारा

पदभार स्विकारताच नानांनी दिला नवा नारा

मुंबई – ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महात्मा फुले पगडी, घोंगडी व चरखा देत नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पदभार हस्तांतरीत केला. नाना पटोले यांनी यावेळी काॅंग्रेस कार्यकर्त्यांना मोदी सरकार चले जाओचा नारा दिला.

नाना पटोले म्हणाले, “शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केले. आजही आंदोलन सुरू असून 200 हून अधिक शेतकरी बांधवांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झालाय. 6 वर्षात केंद्राने समाजातल्या सर्व घटकांवर अन्याय केलाय. आजच्या बैठकीत ‘मोदी सरकार चले जाओ’ हा ठराव घेण्यात आलाय. लोकशाहीत असा ठराव आणायची वेळ आलीय. या देशाला काँग्रेस विचारांनी मोठं केलं. कष्टानं हा देश उभा केला.”

काँग्रेस सत्तेत असताना देशात एलआयसी, विमानतळ आणि इतर अनेक गोष्टी उभ्या केल्या. दुसरीकडे भाजपने 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, 15 लाख खात्यात टाकू असं सांगितलं. मात्र, प्रत्यक्षात त्या फसव्या घोषणा होत्या. देशातील लोकांची मोदी सरकारने अनेक जुमले देऊन फसवणूक केली. स्वामिनाथन आयोग लागू करून शेतमालाला हमीभाव देऊ असं खोटं आश्वासन दिलं. काँग्रेसने स्वामिनाथन समिती बनवली होती, मात्र सत्तांतर होताच भाजपने ते लागू होऊ दिलं नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली,” असंही मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.

COMMENTS