नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार, भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक घेण्याची मागणी !

नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार, भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक घेण्याची मागणी !

मुंबई – माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक का घेतली नाही असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच भंडारा-गोंदियात त्वरीत पोटनिवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य आणि नाना पटोले तिघांचाही राजीनामा लोकसभा अध्यक्षांनी एकाच दिवशी स्वीकारला होता. तरीही गोरखपूर, फुलपूर मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली आणि त्याचा निकालही लागला आहे. परंतु भंडारा गोंदियात अजूनपर्यंत पोटनिवडणूक का घेतली नाही असा सवाल पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे केला आहे.

दरम्यान भाजपवर नाराजी व्यक्त करत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघातील लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. परंतु या पोटनिडणुकीचा कार्यक्रम अजून जाहीर झाला नसल्यामुळे नाना पटोले यांनी लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्य आणि मी एकाचवेळी राजीनामा दिली होता. परंतु उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणूक घेऊन तिचा निकालही लागला तरीही भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीची अजून घोषणाही झाली नसल्यामुळे पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच ही निवडणूक लवकरात लवकर घेण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

COMMENTS