फडणवीस यांच्यात दुसरे बाजीराव पेशवेंचा  डीएनए आहे – नाना पटोले

फडणवीस यांच्यात दुसरे बाजीराव पेशवेंचा डीएनए आहे – नाना पटोले

नवी दिल्ली – राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाणार असल्याची माहिती आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी सरकार हा निर्णय घेत आहे. यावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरजार टीका केली आहे.

फडणवीस यांच्यात दुसरे बाजीराव पेशवेंचा डीएनए आहे. या निर्णयातून फडणवीस यांनी हे सिद्ध केले असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न सरकार करतेय.
महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांना विकण्याचा घाट सरकारने घातला आहे.फडणवीस सरकार पण औरंगजेब, इंग्रजांचे काम करत आहे. शिवनेरी, रायगड किल्ले यात आहे का हे सरकारने स्पष्ट करावे. महाराष्ट्रावर ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज आहे. त्यामुळे गड किल्ले विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.गड किल्ले पार्टीसाठी देणे म्हणजे अस्मितेवर घाला घालणे होय असही पटोले यांनी म्हटलं आहे.

COMMENTS