नाना पटोलेंची पोलखोल यात्रा, मुख्यमंत्र्यांच्या  महाजनादेश यात्रेला देणार उत्तर!

नाना पटोलेंची पोलखोल यात्रा, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला देणार उत्तर!

नागपूर – काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी पटोले हे विदर्भात ‘फडवणीस पोलखोल’ यात्रा काढणार आहेत. विदर्भात जिथे मुख्यमंत्री गेले तिथे जाऊन फडवणीस सरकारने जनतेची कशाप्रकारे फसवणूक केली. याची या यात्रेद्वारे आपण पोलखोल करणार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पटोले हे मुख्यमंत्र्यांची काय पोलखोल करणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान नाना पटोले सांगली आणि कोल्हापूरमधील पूरस्थितीवरुन सरकारवर जोरदार टीका केली होती. राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाला पावसाबाबत सूचना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. मुख्य सचिवांना नोटीस देऊनही कसूर केली. आता महाराष्ट्र व कर्नाटकचे मुख्यमंत्री एकमेकाला दोष देत आहेत. या दोघांविरूद्ध 302 चे गुन्हे दाखल करावेत यासाठी याचिका दाखल करणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. 2005 च्या महापुरात दुसऱ्या दिवशी मदत सुरू केली. तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस अद्याप निर्णय घेत नाहीत. त्यांचा डीएनए तपासण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजीराव पेशव्याप्रमाणेच त्यांचा कारभार सुरू असल्याची टीकाही पटोले यांनी केली होती.

COMMENTS