“मी आणि देवेंद्रजी चांगले मित्र”, त्यामुळे चांगल्या मित्राचं कौतुक  केलंच पाहिजे – नाना पटोले

“मी आणि देवेंद्रजी चांगले मित्र”, त्यामुळे चांगल्या मित्राचं कौतुक केलंच पाहिजे – नाना पटोले

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस लिखित ‘अर्थसंकल्प – सोप्या भाषेत’ या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा काल विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये पार पडला. या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, सभापती रामराजे निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री अनिल परब आणि भाजप आमदार चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार उपस्थित होते. त्यामुळे या कार्यक्रमानिमित्त सत्ताधारी-विरोधक एकाच मंचावर आले होते.

दरम्यान या सोहळ्यानंतर नाना पटोले यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. अवघड समजल्या जाणारा अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय याचं विश्लेषण अवघ्या 51 पानांत केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.
“मी आणि देवेंद्रजी विदर्भातील आहोत. वेगवेगळ्या पक्षात असलो तरी चांगले मित्र आहोत. म्हणून चांगल्या मित्राचे कौतुक हे केलंच पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे देवेंद्रजींची विरोधी बाकांवर बसून कामगिरी अधिक खुलते, असं माझ्या लक्षात आलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी म्हणून त्यांनी यापुढेही अधिकाधिक काळ काम करावं आणि सन्माननीय सदस्यांना मार्गदर्शन ठरेल अशी नवनवीन ग्रंथसंपदा लिहावी”अशी सदिच्छा व्यक्त करतो असं पटोले यांनी म्हटलं आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1292493094473947&id=674249472964982

COMMENTS