नाना पटोलेंनी स्विकारला प्रदेशाध्यक्षाचा पदभार

नाना पटोलेंनी स्विकारला प्रदेशाध्यक्षाचा पदभार

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री व मावळते अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून पदभार स्वीकारला. टिळक भवन, दादर येथे पदभार स्वीकृती सोहळा पार पडला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४२मध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘अंग्रेज चलो जावो, भारत छोडो’ हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरूवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले पदभार स्वीकारला. यावेळी मंत्री सुनील केदार, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे, नसीम खान, मोहन जोशी व पदाधिकारी उपस्थित होते.

याबद्दल बोलताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या सारखा डायनामिक अध्यक्ष मिळाल्याने पक्षाला आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अशी प्रतिक्रिया दिली.

COMMENTS