सरकारवर बेताबेताने टीका करणा-यांना शिवसेनेचा बाणा कसा कळणार ?, नीलम गो-हेंचा विखे पाटलांना टोला !

सरकारवर बेताबेताने टीका करणा-यांना शिवसेनेचा बाणा कसा कळणार ?, नीलम गो-हेंचा विखे पाटलांना टोला !

नागपूर – विधानसभेत नाणारबाबत आवाज ऊठविण्यासाठी शिवसेनेने जो आग्रह धरला त्यावर विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना टीका केली. त्याची स्ट़ंट म्हणून हेटाळणी केली आहे. मुळात जे नेते कधी शेतकर्यांचा संप फोडतात तर कधी सरकारमधील मधूर संबंध सांभाळत बेताबेताने टिका करतात त्यांना आमदार राजन साळवी आणि आमदार प्रताप सरनाईक  तसंच शिवसेनेच्या आमदारांची नाणारवासियांसाठींची आस्था कशी कळणार ? अशा शब्दात शिवसेना आमदार आणि प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी विखे पाटील यांच्यावर टीका केली आहे. काल श्री.विखे पाटील यांचे हेतू शिवसेनेच्या आमदारांना बोलू न देण्याचा होता असा आऱोपही त्यांनी केला. शिवसेना बाणा भेकडांना कसा कळणार ? म्हणूनच विधानपरिषदेतील चर्चेबाबतही ते हेतूपुरस्सर खोटे बोलत आहेत अशी टीकाही गो-हे यांनी केली आहे.

स्वत:च्या पक्षाच्या सहकार्यांनी ऊत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे यासाठी परिषदेचे कामकाज अडवून धरायचे व दुसरीकडे शिवसेना मंत्री बोलले नाहीत असा कांगावा करायचा हा विखे-पाटील व मंडळींचा डाव आहे असाही आरोप त्यांनी केला. मी जो प्रश्न विचारला त्याबाबतही बातम्या, प्रोसिंडिंग्ज व व्हिडिओ आहेत. पण ती विरोधी पक्ष नेत्यांना मुद्दामच नको आहेत. शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरेंनी नाणारवासियांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवेसनेची तीच भूमिका आहे असंही गो-हे यांनी स्पष्ट केलं. विखे पाटील यांनी काल शिवसेनेवर जोरदार टीका करत नाणारविषयी दुटप्पी भूमिका घेतल्याची टीका केली होती.

COMMENTS