नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण !

नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण !

मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. नांदेडमध्ये आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार माधवराव जवळगावकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळगावकर यांच्यावर नांदेडमधील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे.

दरम्यान माधवराव जवळगावकर हे नांदेड जिल्ह्यातील चौथे कोरोनाबाधित आमदार ठरले आहेत. याआधी काँग्रेसच्याच तीन आमदारांना कोरोनाची लागण झाली होती. नांदेडमधून विधान परिषदेवरील काँग्रेस आमदार अमरनाथ राजूरकर यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
तसेच मंत्री अशोक चव्हाण, मोहन हंबर्डे यांनाही कोपोनाची लागण झाली होती. हे दोघंही कोरोनामुक्त झाले असून अमरनाथ राजूरकर आणि माधव जवळगावकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

COMMENTS