नांदेड – लोहा नगरपरिषदेत अशोक चव्हाणांना धक्का, भाजपाचा झेंडा फडकला !

नांदेड – लोहा नगरपरिषदेत अशोक चव्हाणांना धक्का, भाजपाचा झेंडा फडकला !

नांदेड – लोहा नगर परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकला असून एकूण 17 जागांपैकी 13 जागी भाजपा विजयी झाली आहे. तर नगराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी तब्बल 4 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान या निवडणुकीत शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी भाजपाचे कमळ फुलवलं आहे. चिखलीकर हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची पहावयास मिळाली आहे. अशोक चव्हाणांनी या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती परंतु चिखलीकरांनी चव्हाणांना मोठा हादरा दिला आहे.

COMMENTS