खासदार नारायण राणे ‘या’ मतदारसंघातून लढवणार विधानसभेची निवडणूक?

खासदार नारायण राणे ‘या’ मतदारसंघातून लढवणार विधानसभेची निवडणूक?

मुंबई – भाजपचा पाठिंबा घेऊन राज्यसभेत खासदार झालेले नारायण राणे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. याबाबत त्यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे यांनी माहिती दिली आहे.2014 च्या निवडणुकीत पराभव झालेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच नारायण राणे पुन्हा निवडणूक लढवतील, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांनी कुडाळमधील एका कार्यक्रमात राणे हेच आगामी उमेदवार असतील असं जाहीर केलं आहे.

दरम्यान नितेश राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे. नारायण राणे आता कोणतीही निवडणूक लढवतील की नाही याबाबत उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या, तर वैभव नाईक यांच्या विरोधात स्वाभिमानकडून आगामी उमेदवार म्हणूनही अनेकांची नावे चर्चिली जात होती. मात्र कुडाळ-मालवण मतदारसंघातूनच नारायण राणे पुन्हा निवडणूक लढवतील, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नारायण राणे अवतरणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS