सेना-भाजपच्या जवळीकतेनंतर नारायण राणे आज काय बोलणार ?, महाराष्ट्र स्वाभिमानचा आज मुंबईत मेळावा !

सेना-भाजपच्या जवळीकतेनंतर नारायण राणे आज काय बोलणार ?, महाराष्ट्र स्वाभिमानचा आज मुंबईत मेळावा !

मुंबईखासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा आज मुंबईत मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात नाराण राणे हे शिवसेना-भाजपच्या जवळीकतेनंतर काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलं आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काल ‘मातोश्री’वर बैठक झाली आहे. त्यांच्या या बैठकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत नारायण राणे हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी सहा वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मेळावा पार पडणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर मुंबईत पहिल्यांदाच कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ताकद या मेळाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षकपदाची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांसोबत  2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात राणे या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.  त्यामुळे या मेळाव्याकडे लक्ष लागलं असून नारायण राणे हे शिवसेना-भाजपमधील जवळीकतेनंतर काय बोलणार याकडेही लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS