कट्टर विरोधक अडचणीच्या काळात शत्रूला मदत करतो तेव्हा

कट्टर विरोधक अडचणीच्या काळात शत्रूला मदत करतो तेव्हा

सिंधुदुर्ग : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. वेळ आणि काळानुसार परिस्थिती बदलली की दोन राजकीय पक्ष वा नेत्यांमधील संबंध बदल असतात. हे आपण अनेक वेळा पाहिलं आणि वाचलं आहे. राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे या दोघांचा ३६ चा आकडा आहे. दोन्ही कुटुंबांकडून एकमेकांवर चिखलफेक करीत असताना व्यक्तीगत पातळीवर टिका करण्यात आली आहे. या दोघांची दुश्मनी असली तरी ती विकासकामांच्या आड आणू दिली नाही. याच ताज उदाहरण म्हणजे नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पडवे-कसाल येथे सर्व सुविधांनी सज्ज असं लाइफ टाइम मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी येणारे अडथळे चक्क मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दूर केले.

नारायण राणे यांनी आपली राजकीय कारकिर्द शिवसेनेतून झाली. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे नगरसेवक, बेस्टचे अध्यक्षपद, आमदार, मंत्री आणि शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवले. परंतु, त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे नारायण राणे यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. काॅंग्रेसमध्ये विविध मंत्री पदावर काम केल्यानंतर २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान, नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यानच्या काळात राणे आणि उध्दव ठाकरे यांच्यामधील संबंध ताणले होते. राणे व त्यांचे दोन पूत्र निलेश आणि नितेश या दोघांकडून उध्दव ठाकरेंला लक्ष्य केले जात होते. राज्यात सत्ते कोणीही असून राणेंचा एकमेव शत्रू म्हणजे उध्दव ठाकरे. त्यामुळे कोकणात राणे विरुध्द शिवसेना हा संघऱ्ष ठरलेला.

विधानसभेच्या दोन निवडणुकीत नारायण राणे व लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचा शिवसेनेने पराभव केला. प्रत्येक निवडणुकीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे दोन्हीही कुटुंब संधी सोडत नव्हते. दरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी अनेक वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न साकार होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पडवे-कसाल येथे सर्व सुविधांनी सज्ज असं लाइफ टाइम मेडिकल कॉलेज उभारण्यात आलं असून या कॉलेजचं उद्घाटन रविवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्ताने माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केल्याबाबत सांगितले.

मेडिकल कॉलेजसाठी राज्य सरकारच्याही काही परवानग्या आवश्यक असतात. हे करताना उद्धव ठाकरे यांचं मला चांगलं सहकार्य मिळालं. मेडिकल कॉलेजची फाइल परवानगीसाठी राज्य सरकारकडे आली तेव्हा मी मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन केला. तुमच्याकडे माझ्या कॉलेजची फाइल आली आहे. त्यावर सही करा, अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला व फाइलवर सही केली. त्यासाठी मी त्यांचे आभारही मानले, असे राणे म्हणाले.

या घटनेमुळे महाराष्ट्राचे राजकारण किती सुसंस्कृत आहे. हे स्पष्ट होते. जे राणे आणि ठाकरे कुटुंबीय एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून राज्यात ओखले जातात. उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करण्यासाठी नारायण राणेंना भाजपकडून ताकद दिली जाते. ते उध्दव ठाकरे राणेंच्या हाॅस्पीटलच्या परवानगीसाठी मोकळ्या मनाने सही करतात. यावरून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडत असते.

COMMENTS