“राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, राणेंना मिळणार संधी !”

“राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, राणेंना मिळणार संधी !”

पुणे – राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून नारायण राणे यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिल आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. शिवसेना आणि इतर मित्रपक्ष एकत्र निवडणुका लढवू मात्र नाही आले तर त्यांच्याशिवाय लढून जिंकू असा विश्वास यावेळी दानवे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे गेली अनेक दिवसांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्याच्या मंत्रिपदावरुन रावसाहेब दानवे यांनी आज लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे लवकरच राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचं दिसत आहे.

 

 

COMMENTS