नारायण राणे ‘स्वाभिमान’ गुंडाळणार ?

नारायण राणे ‘स्वाभिमान’ गुंडाळणार ?

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे हे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा भाजपमध्ये विलीन करणार असल्याची माहिती आहे. याबाबत चर्चा सुरु असल्याचं नारायण राणे यांनी स्वतः म्हटलं आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. परंतु शिवसेना जर भाजपसोबत असेल तर माझा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार नसल्याचा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे नारायण राणे हे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष गुंडाळणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान नारायण राणे हे भाजपच्या तिकीटावर राज्यसभेवर गेले आहेत. राज्यसभेसाठी भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर नारायण राणे यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर आज नारायण राणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण होणार असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS