2019 मध्ये राज्यात भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान या दोन पक्षांची सत्ता येऊ दे – नारायण राणे

2019 मध्ये राज्यात भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान या दोन पक्षांची सत्ता येऊ दे – नारायण राणे

मुंबई – देशभरात आज गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. मोठ्या उत्साहाने भाविक गणरायाचं स्वागत करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांमध्येही आज गणेशोत्सवाचा उत्साह पहावयास मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे पुरस्कृत खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे. राणेंच्या जुहू येथील ‘अधिश’ या निवासस्थानी गणपतीचं आगमन झालं आहे. त्यांच्या घरगुती गणपतीचं यंदाचं चौथं वर्षं असून यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थिती होते.

दरम्यान यावेळी नारायण राणे यांनी गणरायाला साकडं घातलं आहे. 2019 मध्ये राज्यात भाजप आणि महाराष्ट्र स्वाभिमान या दोन पक्षांची एकत्रित सत्ता येऊ दे तसेच  महाराष्ट्र आणि देशावर येणारी सर्व विघ्नं दूर कर आणि जनतेला, शेतक-यांनाना सुखी-समाधानी ठेव अशी मागणी राणे यांनी गणरायापुढे केली आहे.

COMMENTS