आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबत नारायण राणेंची मोठी घोषणा !

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबत नारायण राणेंची मोठी घोषणा !

सिंधुदुर्ग – राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत खासदार नारायण राणे यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं नारायण राणे यांनी जाहीर केलं आहे. कुडाळ येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिल्ह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार असल्याचा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात लढविल्या जाणाऱ्या जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर केल्या जाणार असल्याचंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी राणे यांनी जिल्ह्यातील विकासाबाबत सरकावर जोरदार टीका केली. सिंधुदुर्गच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील प्रकल्प आपण आणले. मात्र गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प पालकमंत्र्यांना पूर्ण करता आला नाही हे दुर्दैव असल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून, वीस वर्षांनी जिल्हा मागे गेला असल्याची जोरदार टीकाही राणे यांनी केली आहे.

 

COMMENTS