पवारांकडून ‘ती’ भाषा अपेक्षित नव्हती  -नारायण राणे

पवारांकडून ‘ती’ भाषा अपेक्षित नव्हती -नारायण राणे

मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ज्या पद्धतीने आर्थिक निकषाची भाषा आली, ती पवारांकडून अपेक्षित नव्हती असं वक्तव्य महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केलं आहे. तसेच आरक्षणाबाबत शरद पवारांनी आताच का प्रश्न उपस्थित केला असा सवालही राणे यांनी केला आहे. यापूर्वी आरक्षण देत असताना, या विषयावर अनेक आंदोलनं होत असताना आणि त्या विषयांवर आपलं मत देत असताना पवारांनी ‘आर्थिक निकष’ हा शब्द कधी वापरला नव्हता. परंतु पहिल्यांदाच पवारांनी हा शब्द वापरला असल्याचंही राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. यादरम्यानच शरद पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला हवं, अशी भूमिका मांडून खळबळ उडवून दिली असल्याचंही राणे म्हणाले आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवरही टीका केली असून काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांचं थेट समर्थन किंवा या भूमिकेला थेट विरोध करणं टाळलं आहे त्यामुळे याबाबत काँग्रेसची तारांबळ उडाली असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS