नारायण राणे भाजपवर भडकले, म्हणाले मी दीर्घकाळ वाट पाहणा-यांपैकी नाही !

नारायण राणे भाजपवर भडकले, म्हणाले मी दीर्घकाळ वाट पाहणा-यांपैकी नाही !

मुंबई – भाजपकडे आपण मंत्रीपद मागितलेले नाही. त्यांनीच आपल्याला मंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी 31 डिसेंबरपूर्वी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. ती त्यांनी पाळली नाही तर कसलीही वाट न बघता पक्षाचं काम करत राहणार असल्याचा इशारा माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी भाजपला दिला आहे. झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे. शिवसेनेना आपल्या मंत्रिमंडळातील समावेशाला इतकी का घाबरते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवेनेना सरकारचा पाठिंबा काढणार नाही आणि त्यांनी पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असंही नारायण राणे म्हणाले. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाचे भाव हे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे लागतील नाहीतर ते सरकराला जड जातील असाही इशारा त्यांनी भाजप सरकराला दिला.

COMMENTS