मोदी मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे?

मोदी मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे?

सिंधुदुर्ग : मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे. त्यात महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचा समावेश होणार असल्याची चर्चा होती. त्यावर रविवारी सिंधुदुर्ग येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमात खुद्द गृहमंत्री अमित शहा यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोदी मंत्रीमंडळात राणेंना कोणते खाते दिले जाणार बाबत राज्यात उत्सुकता लागून राहिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी भाजप खासदार नारायण राणे यांच्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते हजर होते. यावेळी सभेत गृहमंत्री शहा यांनी नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते माहिती आहे, असे बोलून मंत्रीमंडळ विस्तारामध्ये त्यांचा समावेश करणार असल्याचे संकेत दिले.

सिंधुदुर्गातील कार्यक्रम हा हॉस्पिटलचा जरी असला तरीसुद्धा त्याकडे मोठं राजकीय महत्त्वही आहे. राज्यात ऑपरेशन लोटसची असलेली धास्ती, राणेंनी आघाडी सरकारविरोधात उघडलेला मोर्चा, फडणवीसांची फासे पलटवण्याची भाषा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातल्या कार्यक्रमाची चर्चा राज्यभर आहे.

शहा म्हणाले, “भाजप खासदार नारायण राणे यांच्या छवीचं अनेक प्रकारे लोक वर्णन करतात. मात्र, मी म्हणेल, जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे ते संघर्ष करतात. जो स्वत:वरील अन्यायविरोधात लढू शकत नाही. ते जनतेविराधात लढू शकत नाही. नारायण राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत आपल्या भविष्याचा विचार करत पावलं टाकली. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती आहे. मला काही पत्रकार प्रश्न विचारतात, तुमच्याकडे त्यांच्यावर अन्याय झाला तर? मी सांगितलं, आम्ही अन्याय करणार नाही. आम्ही त्यांचा सन्मानच करु. तुम्ही चिंता करु नका. नारायण राणे यांना कसं साभाळावं आणि सन्मान करावं, ते भाजपला माहिती आहे”.

COMMENTS