आनंद दिघेंचा मृत्यू घातपात नाही, निलेश राणेंनी केलेले आरोप नारायण राणेंनी खोडून काढले !

आनंद दिघेंचा मृत्यू घातपात नाही, निलेश राणेंनी केलेले आरोप नारायण राणेंनी खोडून काढले !

मुंबई – काही दिवसांपूर्वी माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी काही गंभीर आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली होती. आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणावरून त्यांनी शिवसेनाप्रमुखांवर आरोप केले होते. आनंद दिघे यांची हत्या बाळासाहेब ठाकरे यांनी घडवून आणली होती. तो घातपात होता असा आरोप निलेश राणे यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र निलेश राणे यांचा आरोप त्यांचेच वडील नारायण राणे यांनी खोडून काढले आहेत.

आनंद दिघे यांचा मृत्यू घातपात नव्हता. दिघे आजारी असताना त्यांना शेवटचा भेटलेला व्यक्ती मी होतो. मी जेंव्हा दिघेंना पाहिले. तेंव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यामुळे हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर मी बाळासाहेबांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. बाळासाहेबांना डॉ. मांडके यांना पाठवण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी तातडीने डॉ. मांडके यांना पाठवले. मात्र डॉ. मांडके येण्यापूर्वीच दिघे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यामध्ये घातपात नाही. मी हे निलेश राणेंना समजावून सांगेन त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपला आहे. असंही राणे म्हणाले. साम टीव्हीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये राणे यांनी हे स्प्षटीकरण दिलं आहे.

COMMENTS