पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत केलं राष्ट्रवादीचं कौतुक !

पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत केलं राष्ट्रवादीचं कौतुक !

नवी दिल्ली – राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कौतुक केलं आहे. निषेध नोंदवण्यासाठी वेलमध्ये कधीच न उतरल्याबद्दल मोदींनी राष्ट्रवादी आणि बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांची पाठ थोपटली आहे.

दरम्यान काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सत्तास्थापन करण्याबाबत शिवसेनेलाच विचारा असं म्हटलं आहे. तसेच सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु आहे का याबाबत विचारले असता कसली चर्चा, कोणाशी चर्चा असंही पवार म्हणाले आहेत. पवारांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कौतुक केलं आहे. निषेध नोंदवण्यासाठी वेलमध्ये कधीच न उतरल्याबद्दल मोदींनी राष्ट्रवादी आणि बिजू जनता दल (बीजेडी) या पक्षांची पाठ थोपटली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची जवळीकता वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

COMMENTS