योगी आदित्यनाथांची मुक्ताफळे, पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी !

योगी आदित्यनाथांची मुक्ताफळे, पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी !

लखनऊ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे.

‘औरंगजेबने उन्माद माजवला होता, त्यावेळी त्याला भारत मातेचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी नतमस्तक होण्यास भाग पाडले होते. औरंगजेबचा सेनापती अफजल हा अनेकवेळा शिवाजी महाराजांना भेटू इच्छित होता. मात्र त्याचा हेतू शिवाजी महाराजांनी ओळखला होता. तो शिवाजी महाराजांची हत्या करणार होता. मात्र महाराजांनी त्याचा हा डाव उलटवला होता. शिवाजी महाराजांप्रमाणेच मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले असल्याचं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

दरम्यान चीन देखील अनेकवेळा घुसखोरी करत आहे, पण मोदी सरकारमुळे त्यांना मागे हटावेच लागत असल्याचंही योगींनी म्हटलं आहे. तसेच ‘पंतप्रधान नरेद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे जिथे ज्या प्रकारची गरज आहे तिथे त्या प्रकारची रणनिती अवलंबली असल्याचंही ते म्हणालेत.

 

COMMENTS